शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ करणार उसाचे मार्केटिंग : राजेंद्र गड्यान्नावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:22 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज विभागात कारखानदारांना दराच्या स्पर्धेत उतरण्याचे आवाहनशेतकºयांच्या फायद्यासाठीच ‘स्वाभिमानी’ उसाचे मार्केटिंग करणार कारखान्यांनीही ऊस दराच्या स्पर्धेत उतरावे,

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे यावर्षी प्रतिटन किमान तीन हजार रुपये दर मिळवून देण्यासाठी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना उसाचे मार्केटिंग करणार असून, त्यासाठी गावोगावी जनजागृती मेळावे घेणार आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी दिली.

जिल्ह्यातील कारखानदार आणि संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत एफआरपी अधिक २०० रुपये दर देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील कारखान्यांची ‘एफआरपी’च कमी बसत असल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होणारआहे. म्हणून शेतकºयांच्या फायद्यासाठीच ‘स्वाभिमानी’ उसाचे मार्केटिंग करणार असून, या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी या परिसरातील कारखान्यांनीही ऊस दराच्या स्पर्धेत उतरावे, असे आवाहन केले.

येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संघटनेची भूमिका मांडली. यावेळी गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री, आजरा तालुकाध्यक्ष तानाजीराव देसाई उपस्थित होते. कारखानदारांच्या नादान कारभारामुळेच गडहिंग्लज परिसरातील ऊस उत्पादकांचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.गडहिंग्लज परिसरातील ऊस सर्वाधिक साखर उताºयाचा असूनही कमी गाळप यामुळेचया परिसरातील कारखान्यांचीएफआरपी कमी बसते. मात्र, यंदा परिसरात उसाचे उत्पादन चांगले आहे. जिल्हा पातळीवर ठरलेल्यासूत्रानुसार यावर्षी शेतकºयांना दोन पैसे जादा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी ऊस तोडीची घाई करू नये, असे आवाहनही गड्यान्नावर यांनी यावेळी केले.काही कारखाने संपर्कातगेल्यावर्षीचे गाळप आणि उतारा विचारात घेता गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील सर्व कारखान्यांची ‘एफआरपी’ २५०० ते २६०० रुपयांच्या दरम्यान बसते. मात्र, निपाणीच्या हालसिद्धनाथने ३१५१ दर जाहीर केला असून, संकेश्वरच्या हिरण्यकेशीनेही ३००० रुपये दर दिला आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठीच आम्ही उसाचे मार्केटिंग करणार असून, काही कारखाने आपल्या संपर्कात आहेत, असा दावाही गड्यान्नावर यांनी यावेळी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप